🕒 1 min read
मुंबई – भारताचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण गवई ( CJI Bhushan Gavai ) यांनी नुकत्याच झालेल्या मुंबई दौर्यात चैत्यभूमीला भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. सरन्यायाधीशपद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा चैत्यभूमीवरील पहिलाच दौरा होता. या निमित्ताने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.
मात्र, या कार्यक्रमाला राज्याचे तीनही प्रमुख अधिकारी — मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती — अनुपस्थित राहिले. याबाबत सरन्यायाधीश गवई यांनी नाराजी व्यक्त करत, “राज्यघटनेच्या प्रमुख संस्थेचा प्रतिनिधी आपल्या राज्यातून आहे, याचे भान प्रशासनाला असले पाहिजे,” असे सूचक वक्तव्य केले.
CJI Bhushan Gavai Upset Over Protocol Lapse
गवई यांनी स्पष्ट केलं की त्यांना प्रोटोकॉलची पर्वा नाही, पण इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीचा राज्यातील दौरा असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गैरहजर राहणे, हे विचार करण्यासारखे आहे. त्यांनी असंही नमूद केलं की, “मी या मुद्द्यांना लहानसहान मानत नाही, पण दुसरा कोणी असता तर कदाचित घटनात्मक तरतुदी वापरण्याचा विचार झाला असता.”
या घटनेवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, “न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांचा सत्कार सोहळा असताना एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहणे, हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणारे नाही. हा प्रशासनाचा अपमान आहे.”
सरन्यायाधीशांच्या नाराजीनंतर प्रशासनाने याची दखल घेतली असून सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चैत्यभूमीवर जाऊन भेट दिली आणि आपली उपस्थिती न राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- “शिष्टमंडळावरून राजकारण नको” – शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
- दहशतवाद्यांचा ठावठिकाणा नाही, तरी विजय जल्लोष का? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना थेट सवाल
- सुनील शेट्टींचं सी-सेक्शनबाबतचं वक्तव्य वादात; सोशल मीडियावर झाले ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now