🕒 1 min read
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांनी आपल्या मुलगी अथिया शेट्टीच्या डिलिव्हरीबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर वादळ उठले आहे. सुनील यांनी अथियाच्या नैसर्गिक प्रसूतीबद्दल कौतुक करताना सिझेरियन डिलिव्हरीला “सोपा मार्ग” म्हटलं, ज्यामुळे काही युजर्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
सुनील शेट्टी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, “आजकाल बऱ्याच जणांना सिझेरियन मार्ग अधिक सोपा वाटतो, पण अथियाने वेदनादायक नैसर्गिक मार्ग स्वीकारला.” त्यांनी तिच्या धैर्याचं आणि मातृत्व स्वाभाविकपणे स्वीकारल्याचं कौतुक केलं. ते म्हणाले की, अथिया अत्यंत सशक्त आई आहे आणि तिने सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या.
Suniel Shetty statement on C-section is controversial; trolled on social media
मात्र या विधानामध्ये सिझेरियन डिलिव्हरीबाबत “सोपा मार्ग” असा उल्लेख केल्यामुळे अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी हे विधान “असंवेदनशील” आणि “अनावश्यक तुलना” करणारे असल्याचं म्हटलं. त्यांच्या मते, सी-सेक्शन देखील एक कठीण आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून गरजेचा पर्याय असतो.
सुनील शेट्टी यांचं हेतू निष्कलंक असला तरी त्यांच्या या विधानामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मिथुन चक्रवर्तींच्या घरावर टांगती तलवार; BMC कडून नोटीस
- “मी दोषी नव्हतो तरी अडीच वर्षे तुरुंगात होतो”; भुजबळांचा PMLA कायद्याच्या अन्यायावर आक्रोश
- अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या; हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांचा गळफास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








