🕒 1 min read
मुंबई – बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या मालाड (मुंबई) येथील मालमत्तेवर बीएमसीने बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही मालमत्ता एरंगल गावातील हीरा देवी मंदिराजवळ असल्याचं सांगितलं जात आहे.
बीएमसीने मुंबई महानगरपालिका कायदा कलम 351(1अ) अंतर्गत 10 मे रोजी ही नोटीस पाठवली असून, मिथुन यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. जर त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही, तर संबंधित बांधकाम पाडण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
Mithun Chakraborty Notice from BMC
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात 100 हून अधिक बेकायदेशीर बांधकामांची नोंद करण्यात आली आहे. तपासणीत एक तळमजला इमारत, दोन मेझानाइन मजले आणि तात्पुरत्या स्वरूपातील झोपड्या आढळून आल्या. ही सर्व बांधकामे परवानगीशिवाय केल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या मिथुन चक्रवर्ती यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025: LSG vs SRH मधील शेवटची लढत आज लखनऊच्या मैदानात
- भारतासाठी सर्वस्व दिलं, आता विराट कोहलीला भारतरत्न द्या!; माजी क्रिकेटपटूचं वक्तव्य चर्चेत
- राजस्थान विरुद्ध पंजाब आज जयपूरमध्ये थरारक सामना, PBKS साठी ‘करो या मरो’ची परिस्थिती!






