🕒 1 min read
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये 18 मे रोजी दुहेरी सामना रंगणार असून, पहिल्या लढतीत राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) आमने-सामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर दुपारी 3:30 वाजता खेळवण्यात येणार आहे.
राजस्थानचा संघ यंदाच्या मोसमातून आधीच बाहेर गेला आहे. मात्र, उर्वरित दोन सामने जिंकून सन्मानाने हंगाम संपवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. राजस्थान सध्या 12 पैकी केवळ 3 सामने जिंकून गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे.
दुसरीकडे पंजाब किंग्जची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी कायम असून, त्यांना आपले उर्वरित सामने जिंकणे आवश्यक आहे. श्रेसस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाबचा संघ सध्या 7 विजय, 3 पराभव आणि 1 अनिर्णीत सामना अशा कामगिरीसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यांना एप्रिलमध्ये राजस्थानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.
Match Details & Live Streaming Details
सामना: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज – IPL 2025, सामना 59
स्थळ: सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
वेळ व दिनांक: रविवार, 18 मे, दुपारी 3:30 वाजता
थेट प्रक्षेपण: JioStar नेटवर्क चॅनेल्स, JioHotstar अॅप आणि वेबसाईटवर
🏟️ पिच रिपोर्ट: जयपूरचे मैदान फलंदाजांना अनुकूल आहे. सपाट खेळपट्टी आणि लहान सीमारेषा यामुळे धावांचा पाऊस पडेल, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला येथे यश मिळालं आहे.
🔁 हेड-टू-हेड:
एकूण सामने: 29
राजस्थानने जिंकले: 17
पंजाबने जिंकले: 12
शेवटचा सामना: 5 एप्रिल 2025 – राजस्थानने जिंकला
🧢 IPL 2025 RR vs PBKS Playing XI:
राजस्थान रॉयल्स (RR): यशस्वी जैस्वाल, वैभव सुर्यवंशी, रियान पराग (क), कुणाल राठोड, ध्रुव जुरेल (वि), ल्वान-द्रे प्रिटोरियस, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महिश तीक्षणा, युधवीर सिंग चरक, आकाश मधवाल
Impact Player: शुभम दुबे / कुमार कार्तिकेय
पंजाब किंग्ज (PBKS): प्रभसिमरन सिंग (वि), प्रियांश आर्य, मिशेल ओवेन, श्रेयस अय्यर (क), नेहल वढेरा, शशांक सिंग, अमातुल्लाह उमरझई, सुर्यांश शेडगे, मार्को जानसेन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग
Impact Player: मुशीर खान / हरप्रीत ब्रार
📌 महत्वाच्या बातम्या
- “…म्हणून राऊतांना अटक झाली”, शरद पवारांचा ईडी कारवाईवर गंभीर आरोप
- ऑपरेशन सिंदूरवरून विदेश मंत्री जयशंकर अडचणीत; काँग्रेसची राजीनाम्याची मागणी
- अमित शाह आम्हाला दुश्मन का समजतात?; उद्धव ठाकरे यांचा थेट सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











