🕒 1 min read
नवी दिल्ली | विदेश मंत्री एस. जयशंकर यांच्या एका वक्तव्याच्या व्हिडिओवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी हा व्हिडिओ शेअर करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत सवाल उपस्थित केले आहेत, तर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी थेट जयशंकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राहुल गांधींनी ट्विट करत विचारलं की, “भारतीय हवाई दलाच्या कारवाईपूर्वी पाकिस्तानला सूचना देणं हा गंभीर गुन्हा नाही का? याला कोणाची मान्यता होती? आणि यामुळे आपल्या किती विमानांचं नुकसान झालं?”
Rahul Gandhi shared a video of S. Jaishankar
यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीदेखील जोरदार प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “जयशंकर यांनी आपल्या वक्तव्याने देशाचं गुपित उघड केलं आहे. ते विदेश मंत्रिपदावर कसे राहू शकतात हे समजणं कठीण आहे.” त्यांनी जयशंकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर विदेश मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. “विदेश मंत्री डॉ. जयशंकर यांनी जे वक्तव्य केलं ते ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीच्या टप्प्याशी संबंधित आहे. मात्र काहीजण ते ऑपरेशनपूर्वीचं असल्याप्रमाणे चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत,” असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- अमित शाह आम्हाला दुश्मन का समजतात?; उद्धव ठाकरे यांचा थेट सवाल
- IPL 2025 – बंगळुरु-कोलकाता आयपीएल सामना पावसामुळे रद्द
- सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही – जावेद अख्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








