मुंबई – जोपर्यंत तुम्ही समाजाच्या आरक्षणाच्या भुमिकेबद्दल बोलत आहात, तोपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण ज्यावेळी मर्यादा सोडून राजकीय भाष्य करताहेत त्यावेळी आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील, असा इशारा आशिष शेलार यांनी मनोज जरांगे ( manoj jarange ) यांना दिला.
ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिले नाही, किंबहूना ज्यांनी मिळालेले आरक्षण घालवले, त्यांच्या विरोधात जरांगे पाटील कधीच चकार शब्द काढत नाहीत, उलट ज्यांनी दिले त्यांच्या विरोधातच जरांगे का बोलतात ? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, मराठा समाजाच्या मागणीला भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण समर्थन असून किंबहुना मराठा समाजाला आरक्षणा देण्याची भूमिका विरोधी पक्षाने केवळ भाषणात मांडली त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने केले. जरांगे पाटील यांना त्यांचा विसर का पडलाय?
जरांगे पाटील हे या आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा नेतृत्व करतात ते योग्यच, पण याचा अर्थ सकल मराठा समाज म्हणजे जरांगे पाटील आहेत असं मानण्याचे कारण नाही. म्हणून जरांगे पाटील म्हणजेच सगळे मराठा आणि सगळेच मराठा दावणीला बांधले जातील, हा जर त्यांचा समज झाला असेल तर तो त्यांनी दुर करावा, असे शेलार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या











