Share

देवेंद्र फडणवीसांकडे जर ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत तर मग कारवाई करावी, धमक्या कसल्या देता

विरोधकांच्या ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत त्या उघड करेन असे Devendra Fadnavis धमकावत आहेत. फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे क्लिप असतील तर कारवाई करावी, धमक्या कसल्या देता

Published On: 

Devendra Fadnavis । भारतीय जनता पक्षाचे सरकार ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे काम करते हे उघड आहे. ज्यांनी भाजपाची ऑफर स्विकारली ते पवित्र झाले व ज्यांनी नाकारली त्यांच्यावर यंत्रणाच्या माध्यमातून कारवाई करुन जेलमध्ये टाकण्यात आले.

आपल्याकडे विरोधकांच्या ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत त्या उघड करेन असे देवेंद्र फडणवीस धमकावत आहेत. फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे क्लिप असतील तर कारवाई करावी, धमक्या कसल्या देता, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

नाईलाजाने मला पक्षबदल करावा लागला असे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगितले. एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी ईडीच्या धाकाने भाजपाच्या गळाला लागले आहेत, तोच प्रयोग माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही केला असेल, त्या गोष्टींचा ते खुलासा करत आहेत.

गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे काही ऑडिओ व्हिडिओ क्लिप असतील तर त्यांनी कारवाई केली पाहिजे, त्यांना अडवले कोणी. निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त विधाने करून काय उपयोग. राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, राज्य़ात ड्रग्ज आणून तरूणपिढी बरबाद केली जात आहे, ड्रग्ज माफियांना ससूनमध्ये व जेलमध्ये फाईव्ह स्टार सुविधा दिल्या जात आहेत, त्यावर काही बोलत नाहीत. गृहमंत्रीपदाचा उपयोग काय फक्त विरोधकांना धमकवण्यासाठी करत आहात काय, असे नाना पटोले म्हणाले.

आमदारांना निधी देण्यासाठी पैसे काय सरकारी जमिनी विकून आणू काय ? असे अर्थमंत्री अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणाल्याची चर्चा आहे. महायुती सरकारने राज्य गहाण ठेवले आहे, हे आम्ही म्हणत होतो त्याला अर्थमंत्री अजित पवार यांनी दुजोराच दिला आहे.

या सरकारने राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. विकासाच्या नावाखाली कर्ज काढले पण विकास फक्त सत्ताधारी लोकांचा झाला. समृद्धी महार्गावर अपघात होत आहेत. २० वर्ष या महामार्गाला काहीच होणार नाही असा दावा करत होते, त्यावर आता खड्डे पडले, भेगा गेल्या आहेत. ५५ हजार कोटी रुपयांच्या या महामार्गातून सत्ताधारी पक्षातील लोक व त्यांच्या बगलबच्च्यांचीच समृद्धी झाली आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तत्कालिन जळगावचे एसपी प्रविण मुंढे यांना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयने दिला आहे. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. अनिल देशमुख यांचे ऑडिओ आणि व्हिज्युअल आपल्याकडे असल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

‘आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की कशाप्रकारे गिरीश महाजनांवर मोक्का लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजेत याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी दबाव टाकला. हे गुन्हे दाखल करायला लावले. यासंदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी दिले होते, त्यावरच सीबीआयकडे केस झाली.

त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासह कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना मोक्का लावणे, खोट्या केसेसमध्ये फसवणं ही मोडस ऑपरेंडी होती’, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

‘अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं. महाविकासआघाडी सरकार होतं, ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीससमोर लागली, मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीसनी अनिल देशमुखांविरोधात एफआयआर करायला लावला, त्यांच्या सरकारमध्ये तो एफआयआर झाला त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते सुटलेले नाहीत, १०० कोटीच्या वसुलीमध्ये ते बेलवर बाहेर आले आहेत’, असं फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही