मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण ( maratha reservation ) मिळावे यासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी पाच दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केले होते. सलाईन लावून उपोषण करा अशी मागणी मराठा समाजाने केल्यानंतर जरांगे म्हणाले सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे मी उपोषण स्थगित करत आहे.
पुढे बोलतांना जरंगे पाटील म्हणाले की, येत्या 13 ऑगस्टपर्यंत मी सरकारला वेळ देतो, तोपर्यंत त्यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे, ती ओढण्यासाठी आता मला तयारी करायची आहे. त्यामुळे मी सलाईन लावून उपोषण करणार नाही. सलाईन न लावता उपोषण करू दिले तरच उपोषण सुरू ठेवणार असेही मनोज जरांगे म्हणाले.
“मराठ्यांनी भाजपसोबत राहू नका”
“मी काही झुकत नाही. मी जेलमध्ये जायला तयार आहे. मला आता जेलमध्ये टाका. मी उद्या जेलमध्ये जायला तयार आहे. मला जेल मध्ये टाकून फडणवीस यांना निवडणूक काढायची आहे. पण मी आत गेलो तरी भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे, असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे.
मराठ्यांनी भाजपसोबत राहू नका. मी मेलो तरी, माझ्या आत्म्याला शांती तेव्हाच जे हे सर्व पडतील. वेळ पडली तर आम्ही ओबीसीच्या नेत्यांना निवडून आणू”, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
उपोषण संपल्यानंतर पुन्हा राज्य दौरा सुरु करणार आहे. ही घरी बसायची वेळ नाही. येत्या 7 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपर्यंत पुन्हा राज्यात दौरा करणार असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या