छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या लढ्यात रात्रंदिवस एक करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर आता एक अतिशय चिंताजनक बातमी समोर आली आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यामुळेच त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांना अशक्तपणासह ताप आणि थंडीचा त्रास जाणवू लागला आहे.
Manoj Jarange यांना 102 ताप अन् टायफॉइडची लक्षणं
सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना तब्बल 102 डिग्री इतका ताप आहे. सोबतच घशाचा त्रास आणि चक्क टायफॉइडची लक्षणेही आढळून आली आहेत. त्यामुळेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीवर आता बारकाईने लक्ष ठेवलंय.
पुढचे चार दिवस त्यांनी पूर्णपणे आराम करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सध्या त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. या रक्त तपासणीचा अहवाल आल्यावरच प्रकृतीची नेमकी स्थिती स्पष्ट होईल. आणि त्यानंतरच पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा मोठा दौरा पूर्ण केलाय. धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये त्यांनी अनेक सभा आणि गाठीभेटी घेतल्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी गावोगावी जाऊन मांडला. रात्री उशिरापर्यंत बैठका, सततचा प्रवास आणि विश्रांतीचा अभाव यामुळेच त्यांच्या प्रकृतीवर मोठा परिणाम झाल्याचं बोललं जातंय. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi vs BJP: अमित शहांवरील ‘ती’ टीका भोवणार? राहुल गांधींना लोकसभेकडून डेडलाईन
- ‘75 वर्षांवरील नेत्यांनी सत्ता सोडावी अन् युवांच्या हाती सत्ता द्यावी’; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा
- ‘महाराष्ट्राची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही’; CM फडणवीसांची मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











