डिलिमिटेशन बिलावरून ‘इंडिया’ आघाडीत फूट; शरद पवारांच्या भूमिकेवर नाना पटोलेंचे मोठे विधान

डिलिमिटेशन बिलावरून ‘इंडिया’ आघाडीत फूट पडल्याचे समोर आले आहे. शरद पवारांच्या पक्षाने बैठकीकडे पाठ फिरवल्याने नाना पटोले यांनी सूचक विधान केले आहे.

Published On: 

Nana Patole speaking about Sharad Pawar and Delimitation bill

प्रतिनिधी, २९ नोव्हेंबर: देशभरात सध्या डिलिमिटेशन बिलावरून (मतदारसंघ पुनर्रचना विधेयक) मोठा वाद सुरू असून, यावरून ‘इंडिया’ आघाडीत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. या बिलाला विरोध करण्यासाठी दिल्लीत बोलावलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीकडे शरद पवार यांच्या पक्षाने पाठ फिरवली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे. आता सर्वकाही पवार साहेबांवरच अवलंबून असून त्यांनी काय करावे आणि काय नाही, तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, असे पटोले म्हणाले.

केंद्र सरकारने या विधेयकासाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे. काही महिन्यांपूर्वी डिलिमिटेशन आणि महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक पडले होते. आता या नव्या विधेयकाला पवारांचे खासदार पाठिंबा देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून सुप्रिया सुळे यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. या बिलाला पाठिंबा दिल्यास सुप्रिया सुळे राज्याच्या मुख्यमंत्री होतील, अशीही चर्चा मध्यंतरी रंगली होती. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, शरद पवार यांचा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही, असा थेट आरोप करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनीही शरद पवार यांच्या निर्णयावर भाष्य केले आहे.

राहुल गांधी यांनी सकारात्मक भूमिका मांडली असून देशातील लोकांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. याचवेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. पंतप्रधान खोटे बोलत असून यूपीए सरकारच्या काळात सोनिया गांधींनीच महिला आरक्षण बिलासाठी पुढाकार घेतला होता, असे पटोले म्हणाले.

२०२३ मधील महिला बिल एकाच मताने पारित झाले होते. २०२४ मध्येच महिला आमदार जास्त राहिल्या असत्या, पण भाजपच्या कुटील राजकारणामुळे २०२४ मध्ये हे आरक्षण लागू करण्यात आले नाही, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही