Share

माझ्याकडे पेन ड्राईव्ह, हिंमत असेल तर क्लिप…अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान

anil deshmukh gives open challenge to devendra fadnavis | फडणवीस यांच्याकडे अशा कोणत्याही क्लिप्स नाहीत. मला माहिती आहे. पण, ते त्यांच्यावरील आरोपाचा बचाव करण्यासाठी असे काहीतरी सांगत आहे. तरी देखील त्यांच्याकडे क्लिप्स असतील तर त्यांनी जनतेसमोर आणाव्यात. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.

Published On: 

नागपूर | anil deshmukh vs devendra fadnavis : परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयने कारवाई करत तुरुंगात टाकले होते. १३ महिन्याचा तुरुंगावासानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली आहे.

तुरुंगवास देवेंद्र फडणवीस यांच्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपातून मुक्तता हवी असेल आणि या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारी अटक टाळायची असेल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावरील आरोपांच्या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाब टाकला होता, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.

त्यावर प्रतिउत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत देशमुख काय बोलले याच्या ‘क्लिप्स’ माझ्याकडे आहेत. नाईलाजास्तव त्या बाहेर काढाव्या लागतील, असा इशारा दिला होता. अनिल देशमुख यांनी आज पुन्हा फडणवीस यांना खुले आव्हान दिले आहे. तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी पाठवलेला एक खास माणूस माझ्या शासकीय निवासस्थानी चार शपथपत्रे घेऊन आला होता.

  • पहिल्या प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी माझ्याकडे पैसे मागितले, असे नमुद होते.
  • दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालीयन प्रकरणी गंभीर आरोप होते.
  • तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात अनिल परब यांच्यावरील आरोप होते तर
  • चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांनी मला गुटखा व्यावसायिकांकडून वसुली करण्यास सांगितले, असे नमुद होते.

या चारही प्रतिज्ञापत्रांवर मी स्वाक्षरी करावी व तसा जबाब तपास यंत्रणांसमोर द्यावा, या बदल्यात परमबीर सिंग यांच्या आरोप प्रकरणातून सुटका होईल, असे संबंधित व्यक्तीने मला सांगितले होते. या घटनाक्रमाचा पुरावा ‘पेन ड्राईव्ह’मध्ये माझ्याकडे आहे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही.

फडणवीस यांच्याकडे अशा कोणत्याही क्लिप्स नाहीत. मला माहिती आहे. पण, ते त्यांच्यावरील आरोपाचा बचाव करण्यासाठी असे काहीतरी सांगत आहे. तरी देखील त्यांच्याकडे क्लिप्स असतील तर त्यांनी जनतेसमोर आणाव्यात. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही