मोदींचा फोटो हटवणं भोवलं? अमित ठाकरेंसह 20-25 जणांवर पोलिसांत गुन्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 20-25 पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published On: 

Amit Thackeray FIR case

Amit Thackeray : गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतनाच्या (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) कार्यालयात विनापरवाना प्रवेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याप्रकरणी, महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासह २० ते २५ पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय तंत्रनिकेतनातील कर्मचारी डॉ. राजेंद्र काशीराम पाटील (वय ४२) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, हा प्रकार सोमवारी दुपारी १२:३० ते १:१५ या वेळेत गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतनात घडला.

Amit Thackeray FIR case

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, अमित ठाकरे हे २० ते २५ पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांसह संस्थेच्या आवारात विनापरवाना जमा झाले. त्यानंतर त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तक्रारदाराच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकला आणि घोषणाबाजी करत गोंधळ घातला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, या घटनेमुळे कार्यालयाचे कामकाज विस्कळीत झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चतुर्शृंगी पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिता’ आणि ‘महाराष्ट्र पोलीस कायदा’ यांच्या विविध कलमांन्वये अमित ठाकरे व अन्य संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया चोरकर यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू आहे.

प्रकरण काय?

महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात सुरुवातीपासूनच वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ठाकरे यांनी आज शिवाजीनगर येथील ‘गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्निकल एज्युकेशन’ला भेट दिली.

शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही छायाचित्र लावण्यात आले होते.

हे पाहिल्यानंतर, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या शेजारी नरेंद्र मोदींचे छायाचित्र का लावले?, असा प्रश्न अमित ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यानंतर लगेचच, तिथे उपस्थित असलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींचे छायाचित्र त्या ठिकाणाहून काढून टाकले.

मात्र, प्राचार्यांच्या दालनात लावलेल्या नरेंद्र मोदींच्या छायाचित्रावरून एक नवीन वाद निर्माण झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही