🕒 1 min read
मुंबई – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी पुण्यात पार पडली. या सुनावणीवेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेणारे विधान करत खळबळ उडवून दिली. वैष्णवीच्या व्हॉट्सअॅप चॅटचा दाखला देत तिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप साफ फेटाळले.
वैष्णवीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होतं. त्या व्यक्तीचे दुसऱ्या मुलीशी १९ मे रोजी साखरपुडा झाला आहे. आम्ही त्या व्यक्तीचं नाव, डिटेल्स, साखरपुड्याची तारीख आणि चॅटिंगही न्यायालयात दिलं आहे. आम्ही ते चॅट व्हिडिओ व्हायरल केले असते, पण वैष्णवी आमच्या घरची सून होती, त्यामुळे आम्ही ती गोष्ट केवळ तिच्या माहेरी सांगितली असल्याचे हगवणे कुटुंबाच्या वकिलाने सांगितले.
Chitra Wagh slams Hagnwane’s lawyer
हगवणे कुटुंबाच्या वकिलाने न्यायालयात केलेल्या युक्तीवादावरून भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “पोरीला हालहाल करून मारलं आणि आता तिच्या चारित्र्यावर बोलता? असं करून नेमकं काय सिद्ध करायचंय?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी स्पष्ट शब्दांत टीका करत लिहिलं, “खवीसाला कसे सगळे खवीस मिळतात, तसे हे हगवणे आणि त्यांची बाजू मांडणारे. मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलतात. लांडग्याच्या पुढची औलाद आहे तुमची! माणसं नाहीच तुम्ही! पाईपने मारमार मारलं… अजून काय सिद्ध करायचंय?” तसंच पुणे पोलिसांनाही उद्देशून त्यांनी म्हटलं – “एक एक पुरावा गोळा करा… वैष्णवीचे हे मारेकरी फासावर लटकायला हवेत!”
दरम्यान, सून मयुरी जगताप हिने 6 नोव्हेंबर 2024 रोजी पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात मानसिक आणि शारीरिक छळाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर 7 नोव्हेंबरला राज्य महिला आयोगाने पोलिसांना कारवाईसाठी अधिकृत पत्र दिलं होतं. मात्र, तक्रारीनंतर 60 दिवस उलटून गेले तरीही आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही, यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांच्या दिरंगाईवर गंभीर आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- देर आये, दुरुस्त आये; हगवणे प्रकरणात रुपाली चाकणकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
- “चारित्र्यावर संशय- चार कानाखाली मारणं छळ नाही, म्हणणाऱ्या वकिलाच्या चार कानशिलात लावणाऱ्याचा सत्कार करीन” – खडसे
- “तो दोषी असेल तर फाशी द्या, पण आरोपी का करता?” हगवणेंच्या वकिलांचा निलेश चव्हाणबाबत स्फोटक युक्तिवाद!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now