Share

अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या; हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांचा गळफास

Rajendra Hagawane’s daughter-in-law Vaishnavi allegedly died by suicide in Pune after facing harassment for dowry. Police filed an FIR against husband and in-laws. The incident has shocked the city.

Published On: 

Vaishnavi Hagawane Suicide: NCP Leader’s Family Booked for Dowry Harassment in Pune

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) यांनी शुक्रवारी (16 मे) दुपारी मुळशी तालुक्यातील भुकूम येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

वैष्णवी यांच्या वडिलांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वैष्णवीवर पती शशांक, सासू लता, सासरे राजेंद्र, नणंद करिश्मा व दीर सुशील यांनी हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Vaishnavi Hagawane Suicide for Dowry Harassment in Pune

शुक्रवारी दुपारी वैष्णवी हगवणे यांनी घरातील बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. पतीने दरवाजा वाजवला, प्रतिसाद न मिळाल्याने तो दरवाजा तोडण्यात आला. वैष्णवी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात कलम 498(A), 306, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर हुंड्याचा छळ, मारहाण व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ही घटना उघड झाल्यानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही