Share

दहशतवाद्यांचा ठावठिकाणा नाही, तरी विजय जल्लोष का? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना थेट सवाल

Prakash Ambedkar questions PM Modi: “Where are the terrorists behind the Pahalgam attack?” while Amit Thackeray appeals to avoid celebrations until the war outcome is clear.

Published On: 

Prakash Ambedkar questions PM Modi: “Where are the terrorists behind the Pahalgam attack?” while Amit Thackeray appeals to avoid celebrations until the war outcome is clear.

भारत-पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर भाजपकडून देशभरात तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “मोदी, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आज कुठे आहेत? या घटनेला एक महिना उलटून गेला आहे. अजूनही मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. अशा परिस्थितीत साजरे होणारे आनंदोत्सव कोणत्या विजयाचं प्रतीक आहेत?”

Prakash Ambedkar Question Modi Over Pahalgam Attack

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा समावेश होता. विशेष म्हणजे हल्लेखोरांनी केवळ पुरुषांवरच गोळीबार केला होता. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला.

यानंतर 7 मे रोजी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. या कारवाईत सुमारे 100 दहशतवादी ठार करण्यात आले होते. यामध्ये जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या बहावलपूर येथील मुख्यालयाचाही समावेश होता.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी देखील पंतप्रधान मोदींना पत्र लिहून “युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना जल्लोष टाळावा” अशी भावनिक विनंती केली आहे. “ही विजयाची वेळ नाही, तर शहिदांना श्रद्धांजली देण्याची आहे. साजरे होणारे उत्सव अनेकांच्या भावना दुखावणारे आहेत,” असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही