🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी –पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर मौन सोडलं आहे. सासरच्या त्रासामुळे आणि पैशासाठी केलेल्या दबावामुळे वैष्णवीने आयुष्य संपवलं. तिच्या मृत्यूमागे अत्याचाराचा संशय शवविच्छेदन अहवालातून व्यक्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
पुण्यातील सभेत बोलताना त्यांनी सांगितले, “सासू, नणंद आणि नवरा तुरुंगात आहेत, पण सासरा फरार आहे. त्याला पकडण्यासाठी आधी तीन पथकं नेमली होती, आता सहा पथकं लावण्याचे आदेश दिले आहेत.”
Ajit Pawar Orders Action in Vaishnavi Hagwane Case
राजकीय आरोपांवर उत्तर देताना त्यांनी म्हटले, “प्रेमापोटी आम्ही लग्नाला जातो. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी महिलांचा सन्मान करणारा आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मीच राज्यातील महिलांना 1500 रुपये देण्यास सुरुवात केली. जर माझा संबंध या प्रकरणाशी असेल, तर मला फासावर लटकवा,” असे आव्हानही त्यांनी दिलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- “माझे पती नसताना हे लोक घरात घुसून…”; हगवणे कुटुंबीयांविरोधात थोरल्या सुनेचा धक्कादायक आरोप
- लग्नाला गेलो ही माझी चूक असेल तर फासावर लटकवा! – अजित पवारांचा संताप
- छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी; मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या आग्रहामुळे झाली शपथ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now