🕒 1 min read
नाशिक – राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. मात्र, अनुभवी नेते छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. अखेर भाजपचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष आग्रहामुळे भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं.
शपथविधीनंतर भुजबळ यांनी सांगितले की, “मागच्या मंगळवारी आमची बैठक झाली आणि तेव्हाच ठरलं होतं की शपथ घ्यायची आहे, पण मी कोणालाही याची माहिती दिली नव्हती.” तसेच, “मोदी साहेब, अमित शहा यांनी तेव्हाच सांगितलं होतं की दुरुस्त करायला पाहिजे,” असं भुजबळ म्हणाले.
Chhagan Bhujbal Gets Minister Post
नाशिकच्या पालकमंत्रिपदावर चर्चा सुरु असतानाच भुजबळ म्हणाले, “मी पालकमंत्री नसलो तरी काम करण्याची माझी तयारी आहे. मी नाशिकचा बालक आहे, पालक नसलो तरी काही फरक पडणार नाही.” मुख्यमंत्री याबाबत योग्य निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नाशिकमधील लासलगाव आणि येवला भागातून निवडून आलेले भुजबळ यांनी नाशिकवासीयांचे आभार मानले.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025: GT vs LSG Dream11 टीम तयार करताना ‘या’ खेळाडूंवर ठेवा विश्वास!
- महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! 2 दिवसांत 24 मृत्यू, वीज व झाडांच्या दुर्घटनांनी वाढली चिंता
- IPL 2025: मुकेश कुमारला शिस्तभंगाबद्दल सामनाफीचा 10% दंड; मुंबईविरुद्धच्या सामन्यात संताप अनावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now