🕒 1 min read
राज्यात (Maharashtra rain 2025) मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे राज्यातील विविध भागांत 24 नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये वीज पडून, पाण्यात बुडून आणि झाड कोसळून झालेल्या घटनांचा समावेश आहे. तसेच 11 नागरिक जखमी झाले असून 55 प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
सोमवारी एकूण 10 मृत्यूंची नोंद झाली, त्यामध्ये 5 जणांचा वीज कोसळून आणि 5 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याच दिवशी 11 नागरिक जखमी झाले. मंगळवारी 14 मृत्यू नोंदवले गेले असून, त्यात वीज, पाण्यात बुडणे आणि झाड कोसळण्याच्या घटना आघाडीवर आहेत.
Rain havoc in Maharashtra! 24 deaths in 2 days, lightning and tree accidents increase concern
हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट तर ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी ठाण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई परिसरात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार सरी यांची शक्यता आहे.
मुंबईत गेल्या 24 तासांत सांताक्रूझमध्ये 62 मिमी, कुलाब्यात 22.9 मिमी, तर जोगेश्वरी, अंधेरी आणि बोरीवलीमध्ये 60 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
पूर्व-मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, स्थानिक तापमानवाढ आणि आर्द्रतेत वाढ यामुळे हवामानात चांगलेच बदल झाले आहेत. हवामान विभागाने कोकण किनाऱ्यावर चक्रीवादळाच्या शक्यतेचाही इशारा दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025: मुकेश कुमारला शिस्तभंगाबद्दल सामनाफीचा 10% दंड; मुंबईविरुद्धच्या सामन्यात संताप अनावर
- सुनील शेट्टीचा संताप! “जर अजून अफवा पसरवल्या तर पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना उघडं पाडेन”
- DC विरुद्ध विजयानंतर हार्दिक पांड्याचे वक्तव्य; रोहित शर्माचं नाव टाळत ‘या’ दोन खेळाडूंना दिलं श्रेय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now