Share

DC विरुद्ध विजयानंतर हार्दिक पांड्याचे वक्तव्य; रोहित शर्माचं नाव टाळत ‘या’ दोन खेळाडूंना दिलं श्रेय

Hardik Pandya praised Suryakumar Yadav and Naman Dhir for MI’s win over DC, avoiding Rohit Sharma’s name. He credited Santner and Bumrah for making captaincy easy.

Published On: 

Hardik Pandya praised Suryakumar Yadav and Naman Dhir for MI's win over DC, avoiding Rohit Sharma’s name. He credited Santner and Bumrah for making captaincy easy.

🕒 1 min read

मुंबई | IPL 2025: मुंबई इंडियन्सने (MI) दिल्ली कॅपिटल्स (DC) संघावर शानदार विजय मिळवत IPL 2025 मधील 63व्या सामन्यात 59 धावांनी बाजी मारली. या सामन्यात सूर्यकुमार यादवने धमाकेदार 73* धावा केल्या, तर अंतिम ओव्हर्समध्ये नमन धीरने केवळ 8 चेंडूंमध्ये 24* धावा करत संघाला 180/5 पर्यंत नेलं.

मुंबईच्या गोलंदाजांनी एकत्रितपणे जबरदस्त कामगिरी करत दिल्लीला 121 धावांवर गारद केलं. जसप्रीत बुमराह आणि मिचेल सॅन्टर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, विल जॅक्स आणि कर्ण शर्मा यांनीही योगदान दिलं.

Hardik Pandya Praises Suryakumar and Naman, Avoids Rohit Sharma After MI vs DC Win

सामन्यानंतरच्या मुलाखतीत कर्णधार हार्दिक पांड्याने विशेषतः सूर्यकुमार यादव आणि नमन धीरचं कौतुक केलं. मात्र, त्यांने रोहित शर्माचा उल्लेख टाळला, जो यावेळी केवळ 5 धावांवर बाद झाला होता.

“सॅन्टर आणि बुमराहसारखे गोलंदाज असतील, तर माझं काम खूप सोपं होतं,” असं म्हणत त्यांनी आपल्या नेतृत्वाचे श्रेय गोलंदाजांना दिलं.

“160 धावा जरी पुरेस्या वाटल्या असत्या, पण नमन आणि सूर्याने ज्या प्रकारे फिनिश केलं, ते खरोखर जबरदस्त होतं,” असे हार्दिक पांड्या म्हणाले.

13 एप्रिल रोजी दिल्लीच्या घरच्या मैदानावरही मुंबईने 12 धावांनी सामना जिंकला होता. त्या सामन्यात नमन धीरने 17 चेंडूंमध्ये 38 धावा केल्या होत्या.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
IPL 2025 Cricket India Marathi News Mumbai Politics Sports

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या