Share

शुभमन गिल नाही तर ‘हा’ अभिनेता असता सचिन तेंडुलकरचा जावई, पण कुटुंबियांच्या भेटीनंतर संपलं नातं

After meeting each other’s families, Sara Tendulkar and Siddhant Chaturvedi have reportedly ended their secret relationship. Reports say Siddhant took the call to end things.

Published On: 

If not Shubman Gill, this actor would have been Sachin Tendulkar's son-in-law, but the relationship ended after the family meeting

🕒 1 min read

सचिन तेंडुलकर (sachin Tendulkar) यांची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री नसूनही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी सतत चर्चेचा विषय ठरतात. काही काळापूर्वी क्रिकेटर शुभमन गिलसोबत तिचं नातं असल्याच्या चर्चा होत्या, मात्र आता सिद्धांत चतुर्वेदीसोबतच्या ब्रेकअपची माहिती समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धांत आणि सारा यांनी काही काळ एकमेकांना डेट केलं, पण कुटुंबियांच्या भेटीनंतर दोघांनी हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला. हे नातं सिद्धांतने स्वतःहून तोडलं असल्याचंही बोललं जातं आहे. विशेष म्हणजे, दोघांनी हे नातं कधीच अधिकृतरित्या जाहीर केलं नव्हतं.

If not Shubman Gill, this actor would have been Sachin Tendulkar’s son-in-law

याआधी सारा आणि शुभमन गिल यांचं नातं चर्चेत आलं होतं. मात्र सोशल मीडियावर एकमेकांना ब्लॉक केल्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांना अधिक उधाण आलं. यावर शुभमनने “सध्या मी सिंगल आहे आणि माझं पूर्ण लक्ष माझ्या करिअरवर आहे,” असं स्पष्टीकरण दिलं होतं.

दुसरीकडे सिद्धांत चतुर्वेदीचं नाव याआधी नव्या नवेली नंदा हिच्यासोबत जोडलं गेलं होतं. मात्र काही काळानंतर त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं होतं.

सिद्धांतच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ‘गली बॉय’पासून ते ‘गहराइयाँ’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं असून आता तो Dil Ka Darwaaza Khol Na Darling या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही