🕒 1 min read
IPL 2025 | दिल्ली: आज (20 मे) आयपीएल 2025 चा 62वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ प्लेऑफ रेसमधून आधीच बाहेर पडले असले, तरी प्रतिष्ठा जपण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
CSK संघाने त्यांच्या मागील सामन्यात गतविजेते KKR वर रोमांचक विजय मिळवला आहे. चार सलग पराभवानंतर त्यांनी 180 धावांचे लक्ष्य पार करत आत्मविश्वास कमावला आहे. राजस्थानने मागील सामन्यात पंजाबविरुद्ध 220 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली केली होती, मात्र मधल्या फळीत अडथळे आल्याने 10 धावांनी पराभव पत्करावा लागला.
IPL 2025 CSK vs RR
एकूण सामने: 30
CSK विजय: 16
RR विजय: 14
CSK vs RR Match Prediction – Pitch Report
अरुण जेटली स्टेडियमवर बॅटिंगसाठी सर्वोत्तम खेळपट्टी असते. शेवटच्या सामन्यात Gujarat Titans ने येथे 200 धावा सहज पाठलाग केला होता. त्यामुळे दोन्ही संघ नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॉलिंग घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. CSK चे फलंदाज फॉर्मात असून त्यांची खेळी पाहता ते RR पेक्षा थोडे अधिक प्रबळ दावेदार वाटत आहेत. राजस्थानच्या मधल्या फळीतील अडचणी अजूनही कायम आहेत.
CSK vs RR – संभाव्य Playing XI | IPL 2025 सामना 62
CSK: आयुष म्हात्रे, उर्वील पटेल, डेव्हॉन कॉनवे, रवींद्र जडेजा, डेव्हाल्ड ब्रेव्हिस, एम.एस. धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, अंशुल कांबोज, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पथिराना
RR: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रियान पराग, शिमरोन हेतमायर, ध्रुव जुरेल, वानिंदू हसरंगा, क्वेना माफाका, तुषार देशपांडे, आकाश मधवाल, फजलहक फारूकी
📌 महत्वाच्या बातम्या
- 27 कोटींचा कॅप्टन फ्लॉप! श्रीकांत म्हणतात – ऋषभ पंतला बाहेर करा, हसवणारी खेळी!
- IPL 2025 Final अहमदाबादमध्ये; चंदीगडमध्ये होणार दोन प्लेऑफ सामने
- अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यातील वाद मिटला? सगळं ठीक…!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now