🕒 1 min read
IPL 2025: आयपीएल 2025 च्या 62व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) हे दोन माजी विजेते संघ एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना 20 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल.
दोन्ही संघ यंदाच्या स्पर्धेतून बाद झाले असले, तरी हा सामना त्यांच्या प्रतिष्ठेसाठी आणि आगामी मोसमासाठी मुख्य खेळाडू ओळखण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
CSK vs RR Match Preview – IPL 2025 Match 62 at Delhi
अयुष म्हात्रे वि. फजलहक फारुकी – पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करणाऱ्या अयुषला थांबवण्याचं आव्हान फारुकीसमोर आहे.
डेवाल्ड ब्रेव्हिस वि. वनिंदू हसरंगा – CSK चा फॉर्मात असलेला ब्रेव्हिस वि. RR चा फिरकीपटू हसरंगा, ही लढत निर्णायक ठरू शकते.
संजू सॅमसन वि. खलील अहमद – दुखापतीनंतर परतणाऱ्या संजूला सामन्याच्या सुरुवातीलाच खलीलकडून कडवे आव्हान मिळू शकते.
यशस्वी जैस्वाल वि. रविचंद्रन अश्विन – डावखुरा फलंदाज जैस्वाल आणि उजव्या हाताचा अनुभवी फिरकीपटू अश्विन यांच्यातील संघर्ष पाहण्यासारखा असेल.
CSK महत्त्वाचे खेळाडू: अयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेव्हिस, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद
RR महत्त्वाचे खेळाडू: संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, वनिंदू हसरंगा, फजलहक फारुकी
हवामानाचा अंदाज: सामन्यादरम्यान दिल्लीमध्ये पावसाचा कोणताही अंदाज नाही. कमाल तापमान 41°C आणि किमान तापमान 31°C असण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- CSK vs RR : सामना दिल्लीतील हवामान आणि खेळपट्टी अहवाल
- CSK vs RR सामना: चेन्नईच्या संभाव्य Playing 11 ची घोषणा
- “जर गद्दारी केली असेल तर मी राजकारण सोडतो”; शिंदे गटाच्या आमदाराचे थेट आव्हान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now