🕒 1 min read
रायगड – जिल्ह्याचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला संघर्ष आता थेट जाहीर आरोप-प्रत्यारोप आणि वैयक्तिक टोकाला गेला आहे.
18 मे रोजी महाड येथे झालेल्या एका कार्यक्रमात खासदार तटकरे यांनी गोगावले यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी गोगावले यांची नक्कलही केली आणि लोकसभा निवडणुकीत त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Shinde Group MLA Says – If I Betrayed, I Will Quit Politics
यावर आमदार भरत गोगावले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “जर गद्दारी केल्याचं एकही उदाहरण असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे,” असे म्हणत त्यांनी तटकरे यांना महाडच्या विठोबा-विरेश्वर मंदिरात येऊन शपथ घेण्याचे खुले आव्हान दिले.
दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत अजूनही अंतिम निर्णय झाला नसून, मुख्यमंत्रीच यावर निर्णय घेतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी आदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती, पण वादामुळे ती मागे घेण्यात आली होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- ध्रुव राठीच्या ‘द राईज ऑफ शिख’ व्हिडीओवर आक्षेप; वाद वाढल्यानंतर व्हिडीओ प्रायव्हेट केला
- एका बाईसाठी दोन मंत्री भिडले; सरकारमध्ये निर्माण झाला मोठा तणाव
- शेतकऱ्यांकडून CIBIL मागणं थांबवा – CM फडणवीसांचा बँक अधिकाऱ्यांना इशारा