🕒 1 min read
मुंबई – प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आला आहे. त्याने अपलोड केलेल्या ‘द राईज ऑफ शिख’ या व्हिडीओवर शीख समुदायाकडून गंभीर आक्षेप घेण्यात आला. या व्हिडीओमध्ये वापरलेल्या काही अॅनिमेशन आणि माहितीवर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (SGPC) आपत्ती व्यक्त केली. SGPC चे सरचिटणीस गुरुचरणसिंग ग्रेवाल यांनी व्हिडीओमधील ऐतिहासिक तथ्ये चुकीची दाखवण्यात आल्याचा आरोप केला.
Dhruv Rathi faced controversy over his video ‘The Rise of Sikh’
आक्षेपाच्या नंतर ध्रुव राठीने तो व्हिडीओ यूट्यूबवरून प्रायव्हेट केला आहे. त्याने म्हटले की, व्हिडीओतील काही दृश्यं शीख धर्माच्या भावनेला आघात करणारी आहेत आणि या प्रकरणातून धार्मिक व राजकीय वाद वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. त्याने या व्हिडीओचा उद्देश भारतीय इतिहासातील हिरोंची कथा सांगणे असल्याचे स्पष्ट केले आहे.
या वादामुळे ध्रुव राठी ( Dhruv Rathi ) पुन्हा चर्चेत आला असून, सोशल मिडियावरही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- एका बाईसाठी दोन मंत्री भिडले; सरकारमध्ये निर्माण झाला मोठा तणाव
- शेतकऱ्यांकडून CIBIL मागणं थांबवा – CM फडणवीसांचा बँक अधिकाऱ्यांना इशारा
- अमित ठाकरे बालिश आणि प्रसिद्धीच्या हव्यासासाठी मोदींना पत्र; गिरीश महाजनांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





