🕒 1 min read
मुंबई: मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युद्धोत्तर विजयाच्या रॅली टाळाव्यात आणि संयम पाळावा, असा सल्ला देत एक पत्र लिहिले. या पत्रावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. त्यांनी हे पत्र प्रसिद्धीसाठीचा प्रकार असून, त्यात बालिशपणा असल्याचं म्हणत टोला लगावला.
गिरीश महाजन म्हणाले, “संपूर्ण देश आणि जगाने आपल्या सैन्याचे पराक्रम पाहिले आहेत. तुम्हाला अजूनही निकाल लागलाय की नाही याची शंका आहे का? हे वागणं म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठीचा प्रयत्न आहे. असं पत्र लिहिण्याची कुठलीच गरज नव्हती. हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे.”
Girish Mahajan called Amit Thackeray childish
दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळीत तरुण शिवराज दिवटे याच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीवरही महाजनांनी प्रतिक्रिया दिली. “मीही ती बातमी पाहिली. खूपच क्रूर प्रकार आहे. यावर पोलीस कारवाई सुरु झाली आहे आणि कठोर पावले उचलली जातील. समाजात वाढलेली मानसिक विकृती चिंतेची बाब आहे,” असं महाजन म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- अजित पवार कोत्या मनाचे, शिवराज दिवटेला न भेटता…! मराठा क्रांती मोर्चाचा संताप
- AGR प्रकरणात वोडाफोन-एअरटेलला सुप्रीम कोर्टाचा झटका; सरकारकडून सवलतीची मागणी फेटाळली
- विधानभवनात अचानक आग लागल्याने खळबळ; मोठा अनर्थ टळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now