🕒 1 min read
बीड: जिल्ह्यातील परळी येथे तरुण शिवराज दिवटे याच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आले होते. मात्र, दिवटे याच्यावर उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये उपस्थित असतानाही त्यांनी त्याची भेट घेतली नाही. यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे नेते संतप्त झाले असून त्यांनी अजित पवार यांच्यावर असंवेदनशीलतेचा आरोप केला आहे.
शिवराज दिवटे यास काही दिवसांपूर्वी काही अज्ञातांनी डोंगराळ भागात नेऊन बेदम मारहाण केली होती. सध्या त्याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच रुग्णालयात अजित पवार बैठकीसाठी आले होते. मात्र, दिवटे याच्या रूमच्या अगदी शेजारी बैठक असतानाही त्यांनी भेट न घेता थेट पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान ठेवले.
Ajit Pawar Skips Meeting Injured Shivraj Divate in Beed
या वागणुकीवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकानी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, “बारामती व पश्चिम महाराष्ट्रासाठी संवेदनशील असलेले अजित पवार बीडसारख्या जिल्ह्यात मात्र उदासीन आहेत. ते कोत्या मनाचे असल्याचं यावरून स्पष्ट होतं.”
📌 महत्वाच्या बातम्या
- AGR प्रकरणात वोडाफोन-एअरटेलला सुप्रीम कोर्टाचा झटका; सरकारकडून सवलतीची मागणी फेटाळली
- विधानभवनात अचानक आग लागल्याने खळबळ; मोठा अनर्थ टळला
- एअरपोर्टवरच रोमँटिक झाला 60 वर्षांचा आमिर खान; कारमध्ये बसताच गर्लफ्रेंडला केलं किस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now