Share

एअरपोर्टवरच रोमँटिक झाला 60 वर्षांचा आमिर खान; कारमध्ये बसताच गर्लफ्रेंडला केलं किस

Aamir Khan and girlfriend Gauri Spraat’s romantic moment at Mumbai airport goes viral. The couple shared a kiss, drawing more attention than Aamir’s upcoming movie trailer.

Published On: 

60-year-old Aamir Khan got romantic at the airport; Kissed his girlfriend as soon as they got into the car

🕒 1 min read

बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला अभिनेता आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या तो गौरी स्प्रॅटसोबतच्या नात्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

मुंबई एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गौरी आमिरला घ्यायला आली होती. आमिर गाडीजवळ येताच ती सीट बदलते आणि त्याच्यासाठी जागा करते. कॅमेऱ्यांच्या नजरा लागल्यावर गौरी तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते. मात्र या दरम्यान दोघांनी एकमेकांना प्रेमाने किस करताना कॅमेऱ्यात टिपले गेले.

60-year-old Aamir Khan got romantic at the airport; Kissed his girlfriend as soon as they got into the car

या व्हिडिओमुळे त्यांच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. काहींनी त्यांच्या या साजिर्‍या क्षणाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी ट्रोल केलं आहे.

गौरी ही केवळ आमिरची जोडीदार नसून, अनेक वर्षांपासून त्याच्या प्रोडक्शन हाऊसची विश्वासू सहकारीदेखील आहे. एअरपोर्टवर आमिर पारंपरिक लूकमध्ये दिसला – प्रिंटेड कुर्ता आणि निळी धोती पायजमा, तर गौरीने पांढऱ्या कुर्तीसोबत डेनिम जीन्स घातली होती.

कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, आमिरचा आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पण ट्रेलरपेक्षा जास्त लक्ष सध्या आमिर आणि गौरीच्या नात्यावर केंद्रित झालं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Entertainment India Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now