🕒 1 min read
ढाका: बांगलादेशमध्ये एका महिलेस अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर थेट दोन मंत्र्यांमध्ये वाद निर्माण झाला असून सरकारमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नुसरत फारिया या महिलेचं नाव असून तिला रविवारी ढाकाच्या विमानतळावर तिला अटक करण्यात आली. तिच्यावर जुलै महिन्यातील आंदोलनावेळी एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
ती थायलंडला जाण्यासाठी निघाली होती, त्याचवेळी विमानतळावर तिला ताब्यात घेतलं. अटकेनंतर बांगलादेश सरकारमधील दोन मंत्री एकमेकांवर तुटून पडले आहेत. या प्रकरणावरून सरकारमध्येच वादळ निर्माण झालं आहे.
Two Bangladeshi ministers clashed over the arrest of Nusrat Faria
सांस्कृतिक सल्लागार मुस्तफा सरवर फारुकी यांनी फेसबुक पोस्टमधून अटकेवर टीका केली. त्यांनी लिहिलं की, “पुरावे सिद्ध होण्याआधी कोणालाही अटक करणं चुकीचं आहे. ही घटना लज्जास्पद आहे.” त्यांच्या या विधानावरून एक मंत्री त्यांच्या बाजूने उभा राहिला, तर दुसऱ्याने अटकेचं समर्थन केलं.
या विरोधाभासामुळे दोन मंत्री समोरासमोर आले आणि जोरदार वाद झाला. आता हे प्रकरण केवळ एका अटकेपुरतं मर्यादित न राहता, बांगलादेश सरकारच्या गाभ्यापर्यंत पोहोचल्याचं चित्र दिसत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांकडून CIBIL मागणं थांबवा – CM फडणवीसांचा बँक अधिकाऱ्यांना इशारा
- अमित ठाकरे बालिश आणि प्रसिद्धीच्या हव्यासासाठी मोदींना पत्र; गिरीश महाजनांची टीका
- “रात्री झोपताना मला सैफ अन्….”; करीना कपूरने सांगितलं बेडरूम सिक्रेट