Share

शेतकऱ्यांकडून CIBIL मागणं थांबवा – CM फडणवीसांचा बँक अधिकाऱ्यांना इशारा

CM Devendra Fadnavis slammed banks for asking CIBIL scores from farmers and warned strict action. He also urged focus on startups and rural development.

Published On: 

BJP Devendra Fadnavis Reaction On Tanisha Bhise Death Case

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांकडून सीबिल मागणाऱ्या बँकांना स्पष्ट इशारा दिला. त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना सीबिल मागू नका, याबाबत अनेकदा सूचना दिल्या आहेत. पण काही बँका अजूनही हे करत आहेत. हे बंद करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.”

मुख्यमंत्र्यांनी ॲक्सिस, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेच्या प्रतिनिधींना नाव घेऊन फटकारले आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचा उल्लेख करत कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. “जर आज निर्णय घेतला नाही, तर भविष्यात गंभीर परिणाम होतील,” असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis Warns Banks, Stop Asking CIBIL from Farmers

तसेच, त्यांनी गडचिरोलीसारख्या भागांमध्ये उद्योग जाळे तयार होत असल्याचा उल्लेख करत बँकांनी आपल्या प्राथमिकता सरकारसोबत निश्चित करण्याचे आवाहन केले. यासोबतच त्यांनी महाराष्ट्राला स्टार्टअप हब बनवण्यासाठी बँकांनी अधिक सहकार्य करावे, असे आवर्जून सांगितले.

यावेळी 44.76 लाख कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडाही मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, “शेतकरी, उद्योजक आणि तरुणांसाठी संधी निर्माण करणे हे आपले ध्येय आहे आणि त्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची आहे.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही