🕒 1 min read
लखनौ | IPL 2025: लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर सोमवारी झालेल्या IPL सामन्यानंतर Sunrisers Hyderabad चा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि Lucknow Super Giants चा फिरकीपटू दिग्वेश राठी यांच्यात रंगलेल्या वादाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. मात्र सामन्यानंतर अभिषेक शर्माने स्वतः पुढे येत सांगितले की, “आता सर्व काही ठीक आहे.”
206 धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माला बाद करताच, दिग्वेश राठीने त्याच्या प्रसिद्ध “नोटबुक सेलिब्रेशन” व्यतिरिक्त हात हलवत चिडवणारा इशारा केला. या प्रकारामुळे अभिषेक संतापला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सामना पंचांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
Abhishek Sharma speaks on Digvesh Rathi IPL 2025 fight
तणावानंतर, अभिषेक आणि दिग्वेशने सामन्यानंतर शांतपणे संवाद साधला. अभिषेकने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सांगितले की, “दिग्वेशशी सामन्यानंतर बोललो. आता सगळं ठीक आहे.” त्यानंतर दोघेही खेळाडू एकमेकांना गळाभेट देताना दिसले आणि साऱ्या वादावर पडदा टाकला.
📌 महत्वाच्या बातम्या
- रुतुराज फिट… तरी संघाबाहेर? मराठमोळ्या रुतुराज गायकवाडवर MS धोनीच्या CSK चा अन्याय?
- IPL 2025 मध्ये मोठा निर्णय! दिग्वेश राठीचे थेट निलंबन, अभिषेक शर्माला दंड
- कोण बाहेर, कोण पुढे – MI की DC? वानखेडेवर ‘करा किंवा मरा’ची लढत!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now