Share

रुतुराज फिट… तरी संघाबाहेर? मराठमोळ्या रुतुराज गायकवाडवर MS धोनीच्या CSK चा अन्याय?

Aakash Chopra questions Ruturaj Gaikwad’s sudden absence from IPL 2025 despite being named captain of India A. Did CSK fake his injury? Fans demand truth.

Published On: 

Aakash Chopra questions Ruturaj Gaikwad’s sudden absence from IPL 2025 despite being named captain of India A. Did CSK fake his injury? Fans demand truth.

नवी दिल्ली | आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत नसलेल्या रुतुराज गायकवाडच्या ( Ruturaj Gaikwad )अनुपस्थितीवर आता नवे वाद निर्माण झाले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचक असलेल्या आकाश चोप्राने थेट प्रश्न विचारले आहेत की, “रुतुराज खरंच दुखापतीमुळे खेळत नव्हता का?”

रुतुराज गायकवाडला कोपराच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी बाहेर झाल्याचे CSK ने जाहीर केले होते. मात्र, अलीकडेच त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी इंडिया A संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. ही बाब अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे.

Ruturaj Gaikwad IPL 2025 injury controversy

चोप्राने यूट्यूबवर बोलताना सांगितले, “जर रुतुराज आता इंडिया A साठी उपलब्ध आहे, तर तो CSK साठी का नाही खेळू शकला? तो इतक्या लवकर कसा बरा झाला? की दुखापतीबाबत खरी माहिती दिलीच गेली नाही?”

तसेच चोप्राने धोनीच्या कर्णधारपदाबाबतही स्पष्ट मत मांडले. त्याने म्हटले, “धोनी स्वतः संघ तयार करतोय, मग कर्णधारपद इतरांना देण्याची गरजच काय?” रवींद्र जडेजानंतर रुतुराज गायकवाड याला CSK कर्णधारपदासाठी पुढे आणले गेले होते, पण धोनीच पुन्हा नेतृत्व करताना दिसत आहे. त्यामुळे CSK च्या नेतृत्व धोरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही