📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

वानखेडेवर रणसंग्राम! MI आणि DC मध्ये प्लेऑफसाठी ‘करा किंवा मरा’ सामना!

Mumbai Indians and Delhi Capitals lock horns in Match 63 at Wankhede in a crucial playoff decider of IPL 2025.

Published On: 

IPL 2025: MI vs DC Match 63 Preview – Playoff Qualification on the Line at Wankhede

🕒 1 min read

क्रिकेट प्रतिनिधी |  IPL 2025 च्या 63 व्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात थरारक लढत रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून प्लेऑफमधील शेवटचं स्थान मिळवण्यासाठी ही ‘करा किंवा मरा’ स्थिती आहे. सध्याच्या फॉर्मच्या तुलनेत MI थोडा वरचढ मानला जात आहे.

MI कडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि नमन धीरसारखी भक्कम फलंदाजी आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहसोबत दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, करण शर्मा आणि अष्टपैलू अश्वनी कुमारची साथ आहे.

टूर्नामेंटची दमदार सुरुवात करून DC ने पहिल्या सहा सामन्यांपैकी पाच जिंकले. मात्र त्यानंतर त्यांनी फॉर्म गमावला. गेल्या सहा सामन्यांत त्यांना फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे. गोलंदाजी निराशाजनक राहिली असून फलंदाजही सातत्याने मोठी खेळी करू शकलेले नाहीत.

MI vs DC संघांत 2008 पासून एकूण 36 सामने झाले असून त्यात MI ने 20 तर DC ने 16 सामने जिंकले आहेत. याआधीच्या IPL 2025 मधील सामन्यात MI ने DC ला 12 धावांनी हरवले होते.

MI vs DC Wankhede Stadium Pitch Report

संध्याकाळी होणाऱ्या सामन्यात समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असल्यामुळे सुरुवातीला स्विंग मिळतो. त्यामुळे पेसर्सना मदत होण्याची शक्यता आहे. पुढे खेळपट्टी बॅटिंगसाठी पोषक बनते. टॉस महत्त्वाचा ठरणार आहे. दोन्ही संघ प्रथम गोलंदाजी करण्यास पसंत करेल.

IPL 2025 MI vs DC Predicted Playing XIs

मुंबई इंडियन्स (MI): रायन रिकेल्टन (विकेट), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नामन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

इम्पॅक्ट सबस्टिट्यूट: करण शर्मा

दिल्ली कॅपिटल्स (DC): फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेट), समीर रिजवी, के.एल. राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्राज निगम, कुलदीप यादव, टी नटराजन, मुस्तफिजूर रहमान

इम्पॅक्ट सबस्टिट्यूट: दुष्मंथा चमीरा

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!