Share

भ्रष्टाचाराच्या आरोपाखालील भुजबळ पुन्हा मंत्री; मंत्री कोकाटेंची तिखट प्रतिक्रिया!

After Chhagan Bhujbal takes oath as minister, Manikrao Kokate welcomes the move but also indirectly criticizes Bhujbal’s impatience.

Published On: 

Manikrao Kokate sentence stayed by Nashik sessions court

नाशिक – राज्यात अखेर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याआधी अनेकवेळा मंत्रिपद मिळालं नाही यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाशिकसह त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

यावर सहकारी मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भुजबळांच्या मंत्रिपदाचे स्वागत करताना कोकाटे म्हणाले की, “अजित पवार यांनी सर्वसमावेशक मंत्रिमंडळ तयार केलं आहे. भुजबळांचा अनुभव नाशिकसह संपूर्ण राज्यासाठी फायदेशीर ठरेल.”

Manikrao Kokate reacts to Chhagan Bhujbal becoming minister

तरीही कोकाटे यांनी सूचक शब्दांत भुजबळांवर निशाणा साधलाच. “‘जहा नहीं चैना, वहां नहीं रहना’ हे त्यांचं वक्तव्य उतावळेपणाचं होतं. भुजबळ आमच्यापेक्षा सिनियर आहेत, पण थोडी वाट पाहायला हवी होती,” असा टोला कोकाटे यांनी लगावला.

त्याचबरोबर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेबाबत बोलताना कोकाटे म्हणाले, “ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. मला त्यांचं आणि भुजबळांचं काय आहे हे माहित नाही.” अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कोकाटे म्हणाले, “मी जर अजितदादांच्या जवळ लवकर गेलो असतो, तर कदाचित अजून काही फायदा झाला असता. पण ‘देर आये, दुरुस्त आये’, असं म्हणतो.”

 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही