Share

भुजबळांवर सात घोटाळे, तरी मंत्री! हा लोकशाहीचा तमाशा थांबवा; भुजबळांच्या मंत्रिपदावरून अंजली दमानिया संतप्त

Activist Anjali Damania lashes out at Chhagan Bhujbal’s ministerial return, questions Fadnavis and Modi on corruption and ethics in politics.

Published On: 

Anjali Damania challenges Devendra Fadnavis and Ajit Pawar

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सवालांचा भडिमार केला आहे.

एक्सवर पोस्ट करत दमानिया म्हणाल्या, “वाह फडणवीस वाह! एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढत आहोत आणि तुम्ही अशाना पुन्हा सत्तेत आणता? सभ्य माणसं मिळत नाहीत का राजकारणात?”

Anjali Damania slams BJP after Chhagan Bhujbal takes oath as minister

त्याचबरोबर भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते, त्यावेळच्या ‘बिचाऱ्या’ फोटोचा उल्लेख करत त्यांनी खोचक सवाल उपस्थित केला – “आता काय ठणठणीत झाले?”

दमानिया यांनी भुजबळांवर सात घोटाळ्यांचा आरोप करत महाराष्ट्र सदन घोटाळा, कलिना लायब्ररी प्रकरण यांची उदाहरणं दिली. “अशा माणसाला पुन्हा मंत्रिपद देणं म्हणजे आम्हाला काहीच फरक पडत नाही, आम्ही ज्यांना हवे त्यांनाच मंत्री करू असा संकेत आहे का?” असा गंभीर प्रश्न त्यांनी केला.

त्यांनी अजित पवार, प्रफुल पटेल यांच्याबरोबरच अशोक चव्हाणांचाही उल्लेख करत भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला. “दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर करता, मग भ्रष्टाचार या राजकीय दहशतवादाला तुम्ही काय नाव द्याल?” असा थेट सवाल त्यांनी भाजप सरकारला विचारला.

“हा लोकशाहीचा तमाशा आता बघवत नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि “आता हे सगळं थांबवावं असं वाटतंय,” अशी थेट भावना व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही