🕒 1 min read
प्रतिनिधी – राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर राजकीय चर्चांना नवसंजीवनी मिळाली. अन्न आणि नागरी पुरवठा खातं पुन्हा एकदा त्यांच्या ताब्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भुजबळांच्या मंत्रिमंडळात पुनःप्रवेशावर प्रतिक्रिया देताना ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके म्हणाले, “यह तो झाकी है!” त्यांनी यानंतर रोहित पवार, जयंत पाटील यांचाही मंत्रिमंडळात लवकरच समावेश होईल आणि सुप्रिया सुळे केंद्रात दाखल होतील, असा दावा केला. ओबीसी समाजाच्या हितासाठी ही सुरुवात महत्त्वाची असल्याचंही हाके यांनी नमूद केलं.
Chhagan Bhujbal Takes Oath as Minister
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी मात्र छगन भुजबळांच्या मंत्रिपदावर तिखट प्रतिक्रिया दिली. “अजित पवार जातीवादी लोकांना पोसत आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला. भुजबळांच्या शपथविधीमुळे मराठा समाजाला काहीही फरक पडत नसल्याचं स्पष्ट करत, जरांगे यांनी “छगन भुजबळांना तात्पुरतं चॉकलेट दिलं गेलं आहे,” अशा शब्दांत टीका केली.
जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो, असा संशयही व्यक्त केला आणि अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “भुजबळ जातीवादी आहेत, अशा व्यक्तींना मंत्रिपद देणं हे चुकीचं आहे,” असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय
- पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या जाळ्याचा भंडाफोड; ज्योती मल्होत्रासह ११ जण गजाआड
- KL राहुलचं पुनरागमन? IPL 2025 मधील तुफान फॉर्मनंतर T20 संघात निवडीचे संकेत!