🕒 1 min read
आयपीएल 2025 च्या साखळी फेरीतील शेवटचा डबल हेडर आज, 25 मे रोजी रंगणार असून पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने येणार आहेत. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने या मोसमात जोरदार कामगिरी केली असून ते टॉप 2 मध्ये स्थान टिकवण्यासाठी हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असतील.
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सचा हा मोसम निराशाजनक ठरला आहे. 13 पैकी केवळ 3 सामने जिंकून संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. या सामन्यात त्यांचा उद्देश विजयाने निरोप घेण्याचा असेल.
IPL 2025: Dhoni will play his last match as captain today, final battle against Gujarat
या सामन्यात विशेष लक्ष Mahendra Singh Dhoni (MS Dhoni) वर असणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे धोनीला पुन्हा एकदा चेन्नईच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाली होती. मात्र हा सामना कर्णधार म्हणून धोनीचा शेवटचा सामना असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. ऋतुराज पुढील हंगामात नेतृत्व करणार असल्याने धोनीचा हा शेवटचा ‘कॅप्टन’ मॅच ठरणार आहे.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली होती, त्यामुळे तो आयपीएलमधूनही अचानक निवृत्त होईल, अशी चाहत्यांमध्ये भीती आहे. सध्या तरी धोनी पुढे खेळणार की नाही, यावर अधिकृत घोषणा झालेली नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘Bigg Boss’ OTT 4 यंदा रद्द; बिग बॉस 19 होणार साडेपाच महिन्यांचं सर्वात लांब सीझन
- एजाज खान फरार, बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू
- धुळे विश्रामगृहातील रोकड प्रकरण दडपण्याचे गृहखात्याचे आदेश; अनिल गोटेंचा गंभीर आरोप!