🕒 1 min read
धुळे– शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मधून सापडलेल्या 1 कोटी 84 लाख रुपयांच्या रोकड प्रकरणावरून आता मोठा राजकीय भडका उडाला आहे. हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी गृह विभागाकडून गुप्त आदेश देण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
गोटे यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात अजूनही गुन्हा दाखल न करता केवळ तपासाचा देखावा सुरू असून, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा करण्याचे षडयंत्र सुरू आहे. “जर अशा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला, तर मी आमरण उपोषण सुरू करीन,” असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.
Anil Gote Alleges Home Ministry
अनिल गोटेंनी विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या दौऱ्यावेळी काही आमदारांना वाटपासाठी पाच कोटी रुपये आणण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. यावेळी पोलिसांनी विश्रामगृहातील खोलीत छापा टाकून 1.84 कोटी रुपये हस्तगत केले होते. ही खोली आमदार अर्जून खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर बुक होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत तपासाची घोषणा केली होती, मात्र गोटेंनी या चौकशी समितीवर अविश्वास व्यक्त करत ती केवळ काहींना सोयीची ठरणारी असल्याचा आरोप केला. त्यांनी मागणी केली की, प्रवीण गेडाम, तुकाराम मुंडे आणि माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती स्थापन केली जावी.
“जयकुमार रावल यांच्याविरोधात माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. मी ते राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याकडे पाठवले आहेत. तरीही आजवर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळेच मला यंत्रणांवर विश्वास राहिलेला नाही,” अशी स्पष्ट प्रतिक्रिया अनिल गोटेंनी दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बंदूक दाखवून वैष्णवीचं बाळ हिरावलं, आता कुटुंबही विरोधात! निलेश चव्हाण अडचणीत
- “तुला माझ्यासोबत रात्र घालवावी लागेल,” – नेहा पेंडसेचा कास्टिंग काउचवर थरारक गौप्यस्फोट!
- “रुपाली चाकणकरांच्या योग्यतेवर नीलम गोऱ्हेंचा प्रश्न – महिला आयोगाने योग्य पावले उचलली असती तर…!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now