🕒 1 min read
पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी तिच्या 9 महिन्याच्या बाळाला वैष्णवीच्या कुटुंबाकडे बंदुकीच्या धाकावर नकार देणाऱ्या निलेश चव्हाणविरोधात ( Nilesh Chavan ) अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर चव्हाण फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथकं कार्यरत आहेत.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आता निलेशच्या कुटुंबीयांनीही त्याच्याशी संबंध तोडले आहेत. त्याचे भाऊ आणि वडील रामचंद्र चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आम्ही त्याला कुठलीही मदत करणार नाही, तो आमच्याशी संपर्कातही नाही.”
Nilesh Chavan Booked in Vaishnavi Case
दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेश चव्हाणचा एक धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो कंबरेला बंदूक खोचून नाचताना दिसतो. यामुळे त्याच्यावर असलेले आरोप अधिक गंभीर झाले आहेत. पोलिसांकडून शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरु असून, त्याच्यावर भारतीय दंडविधान आणि शस्त्र कायद्यानुसार गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रामचंद्र चव्हाण ( निलेशचे वडील ) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, काल पाच सहा पोलीस रात्री आले होते. निलेश बावधनला गेला, तिकडून आला नाही, आमच्यासोबत काही बोलणं झालं नाही. तो आमच्या संपर्कात नाही. निलेशने असं मत मांडलं होतं की, “सर्वजण पोलीस स्टेशनला चला, मी तिथे येतो, बाळ देतो आणि त्याबद्दल लेखी लिहूनही देतो.” मात्र, समोरून स्पष्ट नकार देण्यात आला होता, असे निलेशच्या वडिलांनी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- “तुला माझ्यासोबत रात्र घालवावी लागेल,” – नेहा पेंडसेचा कास्टिंग काउचवर थरारक गौप्यस्फोट!
- “रुपाली चाकणकरांच्या योग्यतेवर नीलम गोऱ्हेंचा प्रश्न – महिला आयोगाने योग्य पावले उचलली असती तर…!”
- वैष्णवीला संपवलं… आता मयुरीने उघड केलं विकृत कुटुंबाचं गुपित!