🕒 1 min read
मुंबई – पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. हुंड्यासाठी छळ, आणि कुटुंबीयांचा मानसिक त्रास यामागचं कारण असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात पतीसह सासरचे एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ५१ तोळे सोने आणि फॉर्च्यूनर गाडी देऊनही छळ थांबला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
या घटनेवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली असून, “हगवणे कुटुंब हे केवळ लोभीच नाही, तर विकृत मानसिकतेचं आहे. त्यांना राजकीय पाठबळही आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणात लवकरच मोठा खुलासा करणार असल्याची घोषणाही केली आहे.
Vaishnavi Hagawane Case: Damania Slams Political Nexus
दरम्यान, वैष्णवी हगवणेची जाऊ मयुरी जगताप हिनेही आपल्या सासरकऱ्यांविरोधात गंभीर आरोप करत, “माझा छळ करण्यात आला, मारहाण झाली, कपडे फाडले गेले,” असा धक्कादायक खुलासा केला आहे. यावर दमानिया म्हणाल्या, “मयुरी विनाकारण आरोप करेल अशी मुलगी नाही. तिच्या आईने महिला आयोगाला पत्र लिहिलं होतं आणि त्यातही हे स्पष्ट केलं होतं.”
निलेश चव्हाण या व्यक्तीला जालिंदर सुपेकर यांनी बंदुकीचा परवाना मिळवून दिल्याचा आरोप करत दमानिया म्हणाल्या, “अशा लोकांना मदत करणाऱ्या अधिकार्यांमुळे वैष्णवीसारख्या निष्पाप महिलांना प्राण गमवावा लागतो.”
“हगवणे कुटुंबाला राजकीय संरक्षण होते, पोलिस व यंत्रणांवर दबाव होता. ही यंत्रणा आता सक्षम करणं गरजेचं आहे,” असं म्हणत दमानिया यांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “फक्त सुंदर म्हणून पद तर 901 तक्रारी, किती महिलांना न्याय मिळाला?; करुणा मुंडेंचा चाकणकरांवर हल्लाबोल
- आयपीएलच्या नावाखाली ऑनलाईन सट्टेबाजी, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
- राज्यात पावसाचा इशारा कायम, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












