🕒 1 min read
मुंबई: भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या रिअॅलिटी शोजपैकी एक असलेल्या ‘Bigg Boss’ चा आगामी सीझन 19 यंदा प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव घेऊन येणार आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत या शोचं भवितव्य अनिश्चित होतं, मात्र आता स्पष्ट झालं आहे की Bigg Boss 19 नक्कीच होणार असून तो तब्बल साडेपाच महिने चालणार आहे.
या शोसाठी सलमान खान पुन्हा एकदा होस्ट म्हणून परतणार आहेत आणि त्याचा प्रोमो जून महिन्यात शूट केला जाणार आहे. शोच प्रसारण 30 जुलैपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे यंदा Bigg Boss OTT 4 मात्र होणार नाही. Bigg Boss 19 चा मोठा कालावधी आणि तयारीमुळे OTT सीझन रद्द करण्यात आला आहे.
‘Bigg Boss’ OTT 4 cancelled this year; Bigg Boss 19 to be the longest season of five and a half months
Bigg Boss OTT चं पहिलं सीझन करण जोहरने होस्ट केलं होतं, दुसरं सलमान खानने तर तिसऱ्या सीझनला अनिल कपूर होस्ट म्हणून दिसले होते.
Bigg Boss 19 आणि Khatron Ke Khiladi 15 हे दोन्ही शोज Colors वाहिनीऐवजी Sony TV वर प्रसारित होण्याची शक्यता आहे. Banijay Asia प्रोडक्शन कंपनीने Colors सह असलेली भागीदारी संपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही बदलाची शक्यता निर्माण झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- एजाज खान फरार, बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू
- धुळे विश्रामगृहातील रोकड प्रकरण दडपण्याचे गृहखात्याचे आदेश; अनिल गोटेंचा गंभीर आरोप!
- बंदूक दाखवून वैष्णवीचं बाळ हिरावलं, आता कुटुंबही विरोधात! निलेश चव्हाण अडचणीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










