Share

बायोडाटाचा पाऊस अन् आई खुश; मुलींच्या मेसेजने प्रणित मोरे ‘वैतागला’, म्हणाला “मी कामाच्या ठिकाणी…”

Bigg Boss 19 finalist Pranit More reveals he is flooded with marriage proposals and bio-data from girls, leaving his mother happy but him overwhelmed.

Published On: 

Bigg Boss 19 finalist Pranit More reveals he is flooded with marriage proposals and bio-data from girls, leaving his mother happy but him overwhelmed.

🕒 1 min read

मुंबई – ‘बिग बॉस’मध्ये जावं आणि नशीब फळफळावं, हे काही नवीन नाही. पण सध्या ‘Bigg Boss 19’ गाजवणारा आपला मराठमोळा प्रणित मोरे (Pranit More) एका वेगळ्याच कारणाने हैराण झालाय. शोमध्ये आपल्या साध्या आणि शांत स्वभावाने टॉप ३ पर्यंत मजल मारणाऱ्या प्रणितने आता एक मोठा खुलासा केला असून, “मुलींच्या मेसेजेसमुळे मी अक्षरशः वैतागलोय,” असं त्याने थेट सांगितलंय.

Pranit More reveals with marriage proposals

शोमध्ये असताना क्रिकेटर दीपक चहरची बहीण मालती चहर सोबतची त्याची मैत्री चर्चेत होती, पण बाहेर आल्यावर प्रणितला वेगळ्याच गुगलीचा सामना करावा लागतोय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रणितने सांगितलं की, शो संपल्यानंतर त्याला (Pranit More) मुलींचे इतके मेसेज येत आहेत की बास रे बास! फक्त हॅलो-हाय नाही, तर मुली आता थेट लग्नाचे बायोडाटा मेलवर पाठवत आहेत.

प्रणितला जरी या मेसेजेसचा ‘अतिरेक’ वाटत असला, तरी त्याची आई मात्र भलतीच खुश आहे. प्रणित म्हणाला, “एका मुलीचा आलेला बायोडाटा पाहून तर माझी आई खूपच आनंदी झाली होती.” पण मला कामाच्या ठिकाणी हे असले प्रकार नको आहेत, म्हणूनच मी शोमध्येही कोणताही ‘लव्ह अँगल’ किंवा रोमान्सचं नाटक केलं नाही, असं त्याने स्पष्ट केलं.

सलमान खानची मस्करी करण्यापासून ते टॉप ३ पर्यंत पोहोचण्यापर्यंतचा प्रणितचा प्रवास थक्क करणारा होता. आता हिंदी गाजवल्यानंतर प्रणित (Pranit More) ‘बिग बॉस मराठी’ मध्ये एन्ट्री घेणार का? अशी जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. तसं झाल्यास प्रणितच्या चाहत्यांसाठी ती मोठी पर्वणीच ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या