Share

IND vs ENG T20 WC : धोनीच्या एका एन्ट्रीने वानखेडेवर ‘कल्ला’; गंभीरच्या मेहनतीवर ‘त्या’ आकड्याने मारली बाजी!

भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवत फायनल गाठली असली तरी, काल वानखेडेवर गौतम गंभीरच्या रणनीतीपेक्षा धोनीची उपस्थिती आणि ‘7’ आकड्याचीच सर्वाधिक चर्चा झाली.

Published On: 

IND vs ENG T20 WC: गंभीरची मेहनत, पण चर्चा धोनीचीच!

क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल आणि विजयाचं श्रेय नेमकं कोणाला मिळेल, हे कुणीच सांगू शकत नाही. याचा प्रत्यय काल वानखेडेवर पुन्हा एकदा आलाय. गुरुवारी झालेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडला आस्मान दाखवत फायनलमध्ये धडक मारली खरी, पण या विजयात चर्चा मात्र एका वेगळ्याच नावाची रंगलीये.

भारतीय संघाने या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडला धूळ चारली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या रणनितीचं हे मोठं यश मानलं जातंय. पण कॅमेरामनपासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडे फक्त आणि फक्त माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचीच (MS Dhoni) हवा पाहायला मिळाली. स्टँड्समध्ये बसलेल्या धोनीला पाहताच वानखेडेवर चाहत्यांनी एकच जल्लोष केला आणि सगळी लाईमलाईट ‘थाला’ घेऊन गेला.

IND vs ENG T20 WC

या IND vs ENG T20 World Cup सामन्यात एक असा भन्नाट योगायोग जुळून आलाय, ज्याने सगळ्यांनाच थक्क केलंय. भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 253 धावांचा डोंगर उभारला. याला उत्तर देताना इंग्लंडचा संघही कडवी झुंज देत 7 विकेट्स गमावून 246 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विशेष म्हणजे, भारताकडून सर्वाधिक धावा कुटणाऱ्या संजू सॅमसनने 7 उत्तुंग षटकार ठोकले. तर तिकडे इंग्लंडकडून शतक झळकावणाऱ्या जेकब बेथेलनेही 7 षटकारच मारले.

हे सगळे योगायोग आणि भारताने हा सामना नेमक्या 7 धावांनी जिंकल्याने सोशल मीडियावर ‘Thala For A Reason’ चा तुफान पाऊस पडला. धोनीचा जर्सी नंबर ७ असल्याने नेटकऱ्यांनी गंभीरच्या रणनीतीपेक्षा धोनीच्या ‘लकी’ उपस्थितीलाच या विजयाचं श्रेय दिलंय. आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्येही हा ‘७’ चा आकडा अशीच जादू दाखवणार का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही