Share

इराण-अमेरिका युद्धाचा भारताला थेट फटका; नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात वाढ

इराण-अमेरिका युद्धामुळे नागपुरात व्यावसायिक सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाली असून, स्कुल बससाठी गॅस थेट 20 रुपयांनी महागला आहे.

Published On: 

Commercial CNG Nagpur: नागपुरात गॅस भडकला!

जगात कुठेही युद्ध झालं, तरी त्याची पहिली झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसतेच, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता थेट भारतापर्यंत पोहोचला आहे. देशांतर्गत बाजारात नागपुरात कमर्शियल सीएनजी (Commercial CNG Nagpur) च्या दरात अचानक मोठी वाढ झाली असून, याचा थेट फटका शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला आणि सर्वसामान्यांना बसणार आहे.

गेल्या सात दिवसांपासून पश्चिम आशियात अत्यंत तणावाचे वातावरण आहे. या युद्धात आतापर्यंत १४०० हून अधिक जणांना जीव गमवावा लागलाय. पण या सगळ्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतोय. आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस आणि इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे.

Commercial CNG Nagpur

याच पार्श्वभूमीवर नागपुरात ‘गो गॅस’ने (Go Gas) एलपीजी आणि सीएनजीच्या दरात मोठी वाढ केली आहे. वाहनांसाठी लागणाऱ्या गॅसमध्ये प्रति लिटर 8 रुपये 42 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे, स्कुल बस आणि व्हॅनची 12 रुपयांची सबसिडी बंद केल्याने त्यांच्यासाठी गॅस थेट 20 रुपयांनी महागला आहे. आजचा नवा दर 64 रुपये 98 पैसे इतका झालाय. साहजिकच यामुळे विद्यार्थ्यांच्या स्कूल बसचा खर्च वाढणार आहे.

नागपूर नाही, तर पुण्यातही खळबळ उडाली आहे. शिक्रापूर आणि चाकणमधील बीपीसीएल, एचपीसीएल प्लांटमधून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा अचानक थांबवण्यात आला आहे. डीलर्सना गाड्या न पाठवण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. घरगुती गॅसचा तुटवडा भासू नये म्हणून हा सावधगिरीचा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून समजतंय.

तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर जवळपास 16.8 टक्क्यांनी वाढले आहेत. ‘नोमुरा’ या जागतिक संस्थेच्या अहवालानुसार, सध्या भारतातील तेल कंपन्या हा तोटा स्वतः सहन करत आहेत. पण युद्ध असंच सुरू राहिल्यास दिल्लीतून थांबलेली बासमती तांदळाची निर्यात आणि भडकणारे इंधनाचे दर, देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी कोंडी करू शकतात. राजकारण आणि युद्ध जागतिक पातळीवर तापलं असलं तरी खिशाला कात्री मात्र सामान्य भारतीयांच्या लागत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही