Share

सोन्या-चांदीचे भाव अचानक कोसळले! सोनं 10 हजारांनी स्वस्त, चांदीतही मोठी पडझड, काय आहे भाव?

आंतरराष्ट्रीय तणावामुळे सराफा बाजारात मोठी घसरण झाली आहे. सोनं 10 हजारांनी तर चांदी तब्बल 69 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Published On: 

Gold Price Today updates with gold and silver coins on a surface

शेअर बाजार आपटला की सोन्याला नेहमीच झळाळी मिळते, हा आजवरचा बाजाराचा अलिखित नियम राहिलाय. पण अर्थकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. सध्या बाजारात जे घडतंय त्याने भल्याभल्या अर्थतज्ज्ञांनाही कोड्यात टाकलंय!

गेल्या आठवड्यात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरांनी थेट ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र, आता चित्र पूर्णपणे पालटलं असून सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी थेट 1 लाख 70 हजारांवर गेलेले सोने आता चक्क 10 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. आजचा Gold-Silver Rate Today पाहिला तर सोन्याचा भाव 1 लाख 60 हजारांच्या खाली आलाय.

Gold-Silver Rate Today

तर दुसरीकडे, ग्राहकांना घाम फोडणारी चांदीही अचानक शांत झाली आहे. 2 लाख 95 हजार रुपये किलोवर पोहोचलेली चांदी थेट 69 हजार रुपयांनी आपटून 2 लाख 26 हजारांवर आली आहे. एकाच वेळी शेअर बाजार कोसळलेला असताना सोने-चांदीचे दरही घसरल्याने बाजारात मोठा गोंधळ पाहायला मिळतोय.

युद्धजन्य परिस्थितीमुळे अमेरिकेला अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक फटका बसलाय. यामुळे अमेरिकन फेडरल बँक आपला व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. साहजिकच, वाढत्या व्याजदराचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदार आता सुरक्षित परताव्यासाठी बँकांकडे वळत आहेत. त्यामुळे बाजारातील सोन्याची मागणी अचानक घटली आहे.

या मोठ्या घसरणीबाबत सुवर्ण व्यावसायिकांनी एक महत्त्वाचा इशाराही दिलाय. सध्या जरी ग्राहकांसाठी दिलासादायक चित्र असलं, तरी पुढील काळात युद्धाची तीव्रता आणखी वाढल्यास पुन्हा एकदा दरवाढीचा भडका उडू शकतो. त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी सावध पावलं उचलणं गरजेचं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही