🕒 1 min read
नवी दिल्ली – पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावामुळे BCCI ने IPL 2025 च्या फायनल आणि प्लेऑफ सामन्यांच्या ठिकाणी मोठा बदल केला आहे. आता IPL 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
याआधी फायनल कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार होता, कारण मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्स विजेता ठरले होते. मात्र, सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. Cricbuzz च्या रिपोर्टनुसार, IPL प्लेऑफमधील पहिल्या दोन सामने मुल्लनपूरच्या मैदानावर होणार असून दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये आयोजित केला जाणार आहे.
IPL 2025 Final Shifted to Narendra Modi Stadium
अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होणार हा तिसरा IPL फायनल असेल. यापूर्वी 2022 आणि 2023 मध्ये देखील फायनल येथे खेळवली गेली होती. गुजरात टायटन्सने त्यांच्या पदार्पण वर्षातच (2022) फायनल जिंकून इतिहास रचला होता. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, आणि पंजाब किंग्जने प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला आहे, तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शेवटच्या स्पॉटसाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यातील वाद मिटला? सगळं ठीक…!
- रुतुराज फिट… तरी संघाबाहेर? मराठमोळ्या रुतुराज गायकवाडवर MS धोनीच्या CSK चा अन्याय?
- IPL 2025 मध्ये मोठा निर्णय! दिग्वेश राठीचे थेट निलंबन, अभिषेक शर्माला दंड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now