Sanju Samson: फायनलमध्ये संजू सॅमसनचे रौद्ररूप! शतकापासून अवघ्या १२ पावले दूर, न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा उडाला थरकाप

अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये संजू सॅमसनने रौद्ररूप धारण केले असून १४ षटकांत भारताची धावसंख्या १९१ पार गेली आहे.

Published On: 

Sanju Samson IND vs NZ Final Live

Sanju Samson: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज धावांचा पाऊस पडतोय की वादळ आलंय? हाच प्रश्न न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पडला असेल. टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये दव पडण्याच्या भीतीने किवींनी गोलंदाजी निवडली, पण टीम इंडियाच्या फलंदाजांनी त्यांचे सर्व मनसुबे उधळून लावले आहेत.

मैदानावर आता १४ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून ‘ड्रिंक्स ब्रेक’ घेण्यात आला आहे. पण भारतीय फलंदाजांची धावांची तहान काही शमलेली नाही. टीम इंडियाने अवघ्या १४ षटकांतच १ बाद १९१ धावांचा प्रचंड डोंगर उभा केला आहे. भारताचा रनरेट १३.६ इतका भयंकर आहे.

या महामुकाबल्यात संजू सॅमसनने अक्षरशः ‘रौद्र अवतार’ धारण केला आहे. फायनलसारख्या मोठ्या मॅचच्या दबावाला झुगारून देत संजूने किवी गोलंदाजांचा असा काही बाजार उठवलाय की त्यांना कुठे चेंडू टाकावा हेच समजेनासे झाले आहे.

संजू टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऐतिहासिक शतक झळकावण्यापासून अवघ्या १२ धावा दूर आहे. त्याने ४४ चेंडूंत नाबाद ८८ धावा कुटल्या आहेत. या तुफानी डावात त्याने तब्बल ८ गगनभेदी षटकार आणि ५ खणखणीत चौकार ठोकले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट थेट २०० च्या घरात आहे!

संजूला दुसऱ्या बाजूने ईशान किशनची तितकीच खतरनाक साथ मिळत आहे. ईशानने अवघ्या १९ चेंडूंत नाबाद ४३ धावा ठोकत न्यूझीलंडची उरलीसुरली झोप उडवली आहे. त्यानेही आतापर्यंत ३ चौकार आणि ३ कडक षटकार मारले आहेत.

मॅट हेन्री आणि रचिन रवींद्रसारख्या मुख्य गोलंदाजांची या दोघांनी मिळून जबरदस्त धुलाई केली आहे. आता संजू आपले शतक पूर्ण करतो का आणि उरलेल्या ६ षटकांत टीम इंडिया न्यूझीलंडसमोर किती अवाढव्य टार्गेट ठेवते, याकडे १ लाख ३२ हजार प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही