🕒 1 min read
Narendra Modi Stadium: २०२३ च्या १९ नोव्हेंबरची ती काळी रात्र तुम्हाला आठवतेय का? अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १ लाख ३० हजार भारतीयांसमोर पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाने भारताचा विश्वचषक हिरावून घेतला होता. आता पुन्हा एकदा त्याच मैदानावर Narendra Modi Stadium मध्ये टीम इंडिया टी-२० विश्वचषकाची फायनल खेळत आहे. पण मॅच सुरू होण्याआधीच सोशल मीडियावर एका शब्दाने खळबळ उडवली आहे, तो शब्द म्हणजे ‘पनवती’!
रविवारी संध्याकाळी जसा न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, तसा कोट्यवधी भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. कारण २०२३ च्या फायनलमध्येही असंच घडलं होतं! ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली होती आणि दव फॅक्टरचा फायदा घेत मॅच जिंकली होती. आता नेमकी तीच परिस्थिती उद्भवल्याने, नेटकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सध्या एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर हे स्टेडियम भारतासाठी ‘पनवती’ असल्याच्या पोस्ट्स तुफान व्हायरल होत आहेत. “इतकी मोठी मॅच वानखेडेवर का नाही ठेवली?”, “हे मैदान आपल्याला कधीच फळत नाही,” अशा संतप्त आणि भीतीदायक कमेंट्स चाहते करत आहेत. काहींनी तर थेट जुन्या जखमा ताज्या करत, आज पुन्हा तोच ट्रॅजेडीचा सीन पाहायला मिळू नये अशी प्रार्थना सुरू केली आहे.
पण क्रिकेटमध्ये अंधश्रद्धेला थारा नसतो! सूर्यकुमार यादवची युवा सेना हा ‘पनवती’चा टॅग कायमचा पुसून काढण्यासाठी मैदानात उतरली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या संघाने जे मैदान मारता आले नाही, ते आता संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराहच्या साथीने सूर्या मारून दाखवणार का? १ लाख ३२ हजार प्रेक्षकांसमोर टीम इंडिया २०२३ च्या पराभवाचा बदला घेत हा स्टेडियमचा ‘शाप’ मोडणार का, हे पाहणे आता अक्षरशः थरारक ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ Final: सूर्याचा सर्वात मोठा जुगार! फायनलच्या ‘प्लेईंग ११’ मध्ये केला नाही एकही बदल
- IND vs NZ Final: मिचेल सँटनरने जिंकला टॉस! टीम इंडियाच्या हातातून निसटला सर्वात मोठा चान्स?
- अहमदाबाद पोलिसांनी रातोरात घेतला मोठा निर्णय! स्टेडियमबाहेर अभूतपूर्व बंदोबस्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










