भारत विश्वविजेता! फायनलमध्ये न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा, अहमदाबादमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

टीम इंडियाने अहमदाबादमध्ये इतिहास रचला असून न्यूझीलंडला ९६ धावांनी हरवून टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. बुमराह आणि सॅमसन विजयाचे नायक ठरले.

Published On: 

Team India Champion, IND vs NZ Final, T20 World Cup Winner, Jasprit Bumrah, Sanju Samson

IND vs NZ | अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज इतिहास रचला गेला आहे! टी-२० विश्वचषकाच्या हाय-व्होल्टेज फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला ९६ धावांनी धूळ चारत विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे. २५६ धावांच्या महाकाय लक्षाचा पाठलाग करताना किवींचा डाव अवघ्या १५९ धावांत संपुष्टात आला.

भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह. बुमराहने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १५ धावा देत किवींचे ४ मुख्य फलंदाज तंबूत धाडले. त्याला अक्षर पटेलने (२ विकेट्स) आणि अर्शदीप सिंगने मोलाची साथ दिली. न्यूझीलंडकडून केवळ टिम सिफर्टने (५२ धावा) थोडी झुंज दिली, पण भारताच्या भेदक माऱ्यासमोर इतर फलंदाजांनी नांगी टाकली.

तत्पूर्वी, फलंदाजीत संजू सॅमसनच्या ८९ धावा, ईशान किशनच्या ५४ धावा आणि अभिषेक शर्माच्या ५२ धावांच्या जोरावर भारताने ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला होता. शिवम दुबेने शेवटच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला ही धावसंख्या गाठता आली.

अभिषेक शर्माने अखेरच्या चेंडूवर जेकब डफीला बाद करत न्यूझीलंडचा शेवटचा गडी बाद केला आणि भारताच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण असून टीम इंडियाने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही