Share

Tim Seifert: टीम इंडियाचा फायनलमध्ये विजय निश्चित? टिम सिफर्ट ५२ धावांवर आऊट, किवींचा अर्धा संघ तंबूत

अहमदाबादच्या महामुकाबल्यात वरुण चक्रवर्तीने टिम सिफर्टला ५२ धावांवर बाद करत न्यूझीलंडला पाचवा मोठा धक्का दिला असून भारताचा विजय आता सुकर झाला आहे.

Published On: 

ind vs nz Final T20 World Cup 2026 | Tim Seifert

Tim Seifert: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये आता टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाची फक्त औपचारिकता उरली आहे का? असं चित्र आता स्पष्ट दिसू लागलं आहे. २५६ धावांच्या महाकाय लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था आता अत्यंत बिकट झाली आहे.

एकीकडे किवींचे दिग्गज फलंदाज पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळत असताना सलामीवीर टिम सिफर्ट एकटा खिंड लढवत होता. सिफर्टने अवघ्या २६ चेंडूंत ५२ धावांची स्फोटक खेळी करत भारतीय गोटात थोडे टेन्शन निर्माण केले होते. त्याने आपल्या या खेळीत ५ गगनभेदी षटकार आणि २ खणखणीत चौकार ठोकले.

पण फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने सिफर्टला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले आणि ईशान किशनने त्याचा सुरेख झेल टिपला. सिफर्ट बाद होताच न्यूझीलंडची उरली-सुरली आशाही संपुष्टात आली आहे. ९ षटकांच्या खेळानंतर न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद ८३ अशी केविलवाणी झाली आहे.

आता किवी संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी उरलेल्या ६६ चेंडूंत तब्बल १७३ धावांची गरज आहे. त्यांचा आवश्यक रनरेट (RRR) आता १५.७ वर पोहोचला आहे. सध्या मैदानावर डॅरिल मिचेल (१) आणि कर्णधार मिचेल सँटनर (७) झुंज देत आहेत.

हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, बुमराह आणि आता वरुण चक्रवर्ती यांनी केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे भारताचा विजय आता निश्चित मानला जात आहे. १ लाख ३२ हजार प्रेक्षक आता टीम इंडियाच्या विश्वविजेतेपदाचा जल्लोष करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install