Share

Finn Allen: अक्षर पटेलने घेतला मोठा बदला! फायनलमध्ये न्यूझीलंडचा सर्वात घातक फलंदाज आऊट

महामुकाबल्यात अक्षर पटेलने फिन ऍलनची मोठी विकेट काढली असून २५६ धावांचा बचाव करताना न्यूझीलंडची अवस्था २.४ षटकांनंतर १ बाद ३१ अशी झाली आहे.

Published On: 

IND vs NZ Final, T20 World Cup, Finn Allen, Axar Patel,

Finn Allen: शिवम दुबेने कॅच सोडल्याने कोट्यवधी भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला होता, पण आता सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आहे! अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २५६ धावांच्या महाकाय लक्ष्याचा बचाव करताना टीम इंडियाने पहिले आणि सर्वात मोठे यश मिळवले आहे.

न्यूझीलंडचा सर्वात घातक फलंदाज फिन ऍलन तंबूत परतला आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादवने हुशारीने पॉवरप्लेमध्येच फिरकीपटू अक्षर पटेलला गोलंदाजीला आणले आणि त्याने आपल्या पहिल्याच षटकात कमाल करून दाखवली.

अक्षरच्या फिरकीवर मोठा फटका मारण्याच्या नादात फिन ऍलन पूर्णपणे फसला आणि तिलक वर्माच्या हाती सोपा कॅच देऊन बाद झाला. ज्या ऍलनने सेमीफायनलमध्ये शतक ठोकले होते, त्याला अवघ्या ९ धावांवर रोखण्यात भारताला यश आले आहे.

ऍलन बाद झाला असला तरी दुसरा सलामीवीर टिम सिफर्टने मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. तो सध्या अवघ्या ९ चेंडूंत २१ धावांवर नाबाद खेळत असून भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. न्यूझीलंडची धावसंख्या आता २.४ षटकांनंतर १ बाद ३१ अशी झाली आहे.

किवी संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी अजूनही १७.२ षटकांत २२५ धावांची गरज असून त्यांचा आवश्यक रनरेट (RRR) आता १३.० वर पोहोचला आहे. आता सिफर्टचा हा धडाका बुमराह रोखणार की अर्शदीप सिंग? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही